Welcome You All

RSS

पीक




पिकाच्या अपेक्षित उत्पादनासाठी शिफारशीनुसार प्रति हेक्‍टरी रोपांची संख्या असणे आवश्‍यक आहे. दोन रोपांतील योग्य अंतरासह आवश्‍यक हेक्‍टरी रोपांची संख्या येण्यासाठी योग्य बियाणे पेरणी करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद यांनी विकसित केलेल्या क्रीडा टोकण यंत्राचा वापर करणे आता गरजेचे आहे.
पा रंपरिक पेरणी पद्धतीमध्ये दोन ओळींतील बियाण्यांचे प्रमाण किंवा दोन बियाण्यातील अंतर कमी-जास्त होते. पेरणीच्या खोलीवर नियंत्रण ठेवता येत नाही. बियाण्याची असमान उगवण होते. शेतकऱ्यांचा मजुरी व बियाण्यांवर अधिक खर्च होतो. हे लक्षात घेता आता सुधारित पेरणी यंत्रांचा वापर करणे गरजेचे आहे.

बैलचलित क्रीडा टोकणयंत्र ः
केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद येथे विकसित केलेले हे बैलचलित बहुपीक टोकण यंत्र आहे. हे यंत्र दोन, तीन किंवा चार फणांमध्ये उपलब्ध आहे. हे यंत्र सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ज्वारी, हरभरा, बाजरी, मका, भुईमूग, वाटाणा, गहू इत्यादी पिकांच्या पेरणीसाठी शिफारस केलेले आहे.

यंत्राची संरचना ः
या यंत्राचे बीज व खत पेटी, गती देणारी यंत्रणा, दिशा देणारी चाके, फण, बियाण्याच्या तबकड्या, बियाणे, नळ्या हे मुख्य भाग आहेत. हे सर्व भाग मुख्य सांगाड्यावर बसविलेले आहेत.

बीज व खत पेटी ः
या यंत्राच्या लोखंडी सांगाड्यावर एक पेटी बसविलेली आहे. त्या पेटीचे खत व बियाण्यासाठी असे दोन मुख्य भाग केलेले आहेत. या मुख्य भागाचे फणाच्या संख्येनुसार तीन फणी यंत्रात प्रत्येकी तीन उपभाग केलेले आहेत. अशा प्रकारे यंत्राच्या प्रत्येक फणासाठी स्वतंत्र बीज व खतपेटी दिलेली आहे. या यंत्राच्या प्रत्येक फणासाठी बीजपेटीत स्वतंत्र कप्पा दिलेला असल्यामुळे आंतरपीकसुद्धा घेता येते. बियाण्याची तबकडी बीजपेटीत बसविण्यासाठी स्प्रिंग व बोल्ट दिलेला आहे. या बोल्टमध्ये तबकडी स्प्रिंग नटच्या साह्याने घट्ट बसवावी लागते. खतपेटीच्या तळाशी दिलेल्या एका लोखंडी पट्टीद्वारे खतनियंत्रण केले जाते. यासाठी खतपेटीच्या तळाशी दिलेल्या छिद्रावर लोखंडी पट्टीवरील छिद्राची लांबी कमी-जास्त करून खताची मात्रा प्रमाणित करता येते. खतपेटीत दाणेदार खत जमा होऊ नये किंवा खताचा ढीग होऊ नये म्हणून एक ऑगर दिलेला आहे.

गती देणारी यंत्रणा ः
बीजपेटीतील तबकड्यांना व खतपेटीतील ऑगरला जमिनीवर चालणाऱ्या दातेरी चाकाद्वारे गती दिलेली आहे. बीजपेटीतील तबकड्या व खतपेटीतील ऑगर, चेन व स्प्रॉकेटच्या साह्याने दातेरी चाकास जोडलेले आहेत. या चाकाचे व बियाणे नियंत्रित करणाऱ्या तबकड्यांच्या गतीचे प्रमाण 1ः1 आहे. त्यामुळे जमिनीवर चालणाऱ्या चाकाची एक फेरी पूर्ण झाली असता बियाणे तबकडीची एक फेरी पूर्ण होते.

बियाण्याच्या तबकड्या ः
प्रत्येक बीजपेटीत शिफारशीप्रमाणे बियाणे फणात प्रमाणित करण्यासाठी प्लॅस्टिकच्या तबकडीचा वापर केलेला आहे. तबकडीच्या व्यासावर खाचा दिलेल्या आहेत. प्रत्येक खाचेमध्ये एक बियाणे येईल अशा प्रकारे त्याची संरचना आहे. तबकडीवरील खाचांची संख्या व आकार पिकानुसार दिलेला आहे ः
विविध पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त बियाणे तबकड्यांची संरचना
पीकबियाण्याच्या तबकडीवरील खाचांची संख्यादोन रोपांतील अपेक्षित अंतर (सें.मी.)
सोयाबीन235
तूर1210
हरभरा - मध्यम1210
हरभरा काबुली 167.5
ज्वारी, उडीद, मूग, बाजरी1210
मका4/815/30
भुईमूग- मध्यम, वाटाणा1210
भुईमूग - मोठा167.5

खोली नियंत्रित करणारी चाके ः
या यंत्राच्या दोन्ही बाजूला चाके दिलेली आहेत. या चाकाच्या ऍक्‍सलवर पाच सें.मी. अंतरावर छिद्रे दिलेली आहेत. या छिद्राद्वारे चाकाच्या ऍक्‍सलची उंची कमी-जास्त करता येते. हे छिद्र मुख्य सांगाड्यावर दिलेल्या छिद्रावर जुळवून पेरणीची खोली 5 ते 15 सें.मी. दरम्यान कमी-जास्त करता येते.

फण ः
या यंत्रास शॉवेल प्रकारचे फण दिलेले आहेत, तसेच दोन फणांतील अंतर आवश्‍यकतेनुसार 9 ते 18 इंचांपर्यंत कमी-जास्त करता येते.

तरफ ः
शेताच्या कडेला वळताना बी व खत बंद करण्यासाठी जमिनीवर चालणारे चाक उचलावे लागते. त्यासाठी यंत्राच्या हॅण्डलजवळ एक तरफ दिलेली आहे. वळविण्यापूर्वी ही तरफ हॅण्डलवर दिलेल्या हुकामध्ये टाकल्यास बी व खत पेरणी बंद होते. या यंत्राची किंमत 14,000 रुपये इतकी आहे.

मांजरा कृषी विज्ञान केंद्रांतर्गत टोकण यंत्राची प्रक्षेत्र चाचणी
मांजरा कृषी विज्ञान केंद्र, लातूरअंतर्गत सोयाबीन, मका, हरभरा, भुईमूग, ज्वारी, गहू; तसेच आंतरपीक सोयाबीन + तूर या पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रक्षेत्र चाचणी घेण्यात आली. प्रथम चार फणी यंत्रांची चाचणी घेण्यात आली. या यंत्राची कार्यरत रुंदी एक मीटर आहे. दोन ओळींतील अंतर दीड फूट (45 सें.मी.) ठेवून पेरणी करताना या यंत्राचे तीन फण कार्यरत असतात. परिणामस्वरूप एक फण काढून ठेवावा लागतो, तसेच लातूर जिल्ह्यातील शेतकरी बहुतेक पिके दीड फूट अंतरावर पेरणी करतात. त्यामुळे एक मीटर रुंदीच्या तीन फणी यंत्राची चाचणी घेण्यात आली. या यंत्राने पेरणी करताना याचे सर्व फण कार्यरत राहतात. अशा प्रकारे चार फणी यंत्राऐवजी वजनाने कमी व एक मीटर रुंदीचे तीन फणी यंत्र उपयुक्त आहे, तसेच बैलांवरील ताण (ओढशक्ती) कमी झाला.

तिळाचे बियाणे बारीक असल्याने जमीन चांगली तयार करावी. उन्हाळ्यात उभी-आडवी वखरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी, काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे व पठार फिरवून पेरणी करावी. अर्ध रब्बी हंगामात वखराच्या पाळ्या देऊन जास्तीत जास्त पाणी शेतात मुरवावे.
बियाण्याचे हेक्‍टरी प्रमाण -खरीप व अर्ध-रब्बी हंगामाकरिता प्रति हेक्‍टरी दीड ते दोन किलो व उन्हाळी हंगामाकरिता तीन ते चार किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया -पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बेन्डाझिम यांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

पेरणीची योग्य वेळ -खरिपातील पेरणी जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला आठवडा.
अर्ध-रब्बी -सप्टेंबरचा पहिला पंधरवडा.
उन्हाळी -फेब्रुवारीचा पहिला पंधरवडा.
पेरणीची पद्धत -बियाणे फार बारीक असल्यामुळे त्यात समप्रमाणात वाळू/गाळलेले शेणखत/राख/माती मिसळावी. पाभरीने/तिफणीने 30 सें.मी. वर पेरणी करावी.
आंतरपिके -तीळ हे आपत्कालीन पीक, आंतरपीक आणि मिश्र पीक म्हणून घेता येते. आंतरपीक पद्धतीमध्ये तीळ + मूग (3ः3), तीळ + सोयाबीन (2ः1), तीळ + कापूस (3ः1) हे फायदेशीर आढळून आलेले आहे.

रासायनिक खतांची मात्रा देण्याची वेळ 
पेरणीच्या वेळेस अर्धे नत्र (12.5 कि./हे.) व पूर्ण स्फुरद (25 कि./हे.) देऊन दुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 कि./हे.) द्यावा. एकेटी-64 या वाणाकरिता रासायनिक खतां ची मात्रा 40 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी, तसेच पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर 20 किलो प्रति हेक्‍टर या प्र माणात दिले असता उत्पन्नात वाढ होते.

विरळणी/ खाडे भरणे -
रणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून दोन रोपात 10-15 सें.मी. अंतर ठेवावे. म्हणजे शेतात हेक्‍टरी 2.25 ते 2.50 लाख रोपांची संख्या राहील.

आंतरमशागत -
आवश्‍यकतेनुसार दोन ते तीन कोळपण्या/ खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी.

ओलित व्यवस्थापन -
उन्हाळी पिकास/ अर्ध रब्बी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12-15 दिवसा ंनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

वेळेवर कापणी महत्त्वाची -
तिळाच्या कापणीस उशीर झाल्यास बोंड्या फुटून बी सांडते व नुकसान होते, त्यामुळे कापणी वेळेवर करावी. झाडाची पाने पिवळी पडून बोंड्या पिवळ्या होण्यास सुरवात होताच पीक कापणीस तयार झाले असे समजावे. कापणी केल्यावर ताबडतोब पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात. तीन ते चार दिवसांनी बोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साहाय्याने तीळ झाडावे. काही बोंड्या तडकल्या नसल्यास चार ते पाच दिवसांनी परत पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून आणि वाळवून साठवावे. तिळाचे हेक्‍टरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll