Welcome You All

RSS
Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारी

ख रीप हंगामाच्या पूर्वतयारीमध्ये माती परीक्षण, जमिनीची पूर्वमशागत, बियाण्याची तरतूद, सेंद्रिय व रासायनिक खतांची त्याचप्रमाणे जिवाणू खतांची उपलब्धता करून ठेवणे, कीटकनाशकांची तसेच पेरणी अवजारे व हत्यारांची दुरुस्ती या बाबींचा समावेश होतो. जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेण्यासाठी माती परीक्षण उपयोगी ठरते. माती परीक्षणानुसार पिकास द्यावयाची खताची मात्रा निश्‍चित करता येते. जमिनीच्या पूर्वमशागतीमध्ये शेतात ढेकळे असल्यास ती बोड किंवा मैंदाच्या साह्याने फोडून घ्यावीत, जमिनीस उंच-सखलपणा असल्यास तिफणीने सपाट करावी. आडव्या-उभ्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात, शेवटच्या कुळवणीअगोदर शिफारशीप्रमाणे चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. जमिनीची बांधबंदिस्ती करून पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून शेत स्वच्छ करावे.

पीक उत्पादनवाढीसाठी संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा महत्त्वाचा वाटा असल्याने पेरणीसाठी बियाण्याची निवड करताना जास्त उत्पादन देणाऱ्या, खतास चांगला प्रतिसाद देणाऱ्या, कमी कालावधीत व कमी पाण्यात येणाऱ्या तसेच रोग व किडीस प्रतिकारक्षम असणारे वाण निवडावेत. शक्‍यतो प्रमाणित बियाणे पेरणीसाठी वापरावे. बियाणे खरेदी करताना त्याची उत्पादन तारीख, शुद्धता, वाणाचे/ जातीचे नाव, उगवणक्षमता इत्यादी सर्व गोष्टी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून त्याची पक्की पावती घ्यावी. विकत घेतलेल्या बियाण्याच्या पिशवीस असलेले लेबल व टॅग जपून ठेवावा, यदाकदाचित बियाण्यात काही दोष आढळल्यास बिल, लेबल व टॅगची संबंधितांकडे तक्रार करताना गरज पडते.

पीक पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी पिकानुसार शिफारस केलेल्या जिवाणू खतांची खरेदी करून ठेवावी. ज्वारी, बाजरी, भात, मका या एकदल व तृणधान्ये पिकासाठी ऍझोटोबॅक्‍टर, शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी रायझोबियम हे जिवाणू संवर्धक वापरावे. वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम वापरावे. स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा आवश्‍यकतेनुसार बीजप्रक्रियेसाठी वापर करावा.

पूर्वहंगामी कापूस लागवड ठिबक सिंचनावर केल्याने सोटमुळे जमिनीत खोलवर जाऊन पिकाची वाढ जोमदार होते, लवकर फुले येतात. पर्यायाने हा कापूस हंगामी कापसाच्या तुलनेत वेचणीसाठी 20 ते 25 दिवस लवकर तयार होतो आणि उत्पादनात भरीव वाढ होते.

पूर्वहंगामी कापूस पिकासाठी उष्ण, कोरडे व कमी आर्द्रतायुक्त हवामान मानवते. या काळात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्वहंगामी कापूस पीक 25 ते 30 दिवसांचे होऊन त्यास पाते लागण्यास सुरवात होते. ठिबक सिंचनावर आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड योग्य वेळी करता येते व या पिकास पाण्याचा कोणताही ताण बसत नाही. सर्वसाधारणपणे पाच अश्‍वशक्तीचा पंप ताशी 18 ते 21 हजार लिटर पाणी देतो. एवढ्या पाण्यावर कमीत कमी दोन ते अडीच एकर क्षेत्रावर पूर्वहंगामी कापसाची लागवड मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ठिबक पद्धतीने करणे शक्‍य आहे.

जमिनीची निवड ः
मध्यम ते भारी, काळी, कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. हलक्‍या, उथळ आणि पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे.

पूर्वमशागत ः
एक खोल नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकाची धसकटे, पाला व काडीकचरा गोळा करून तो जाळावा व शेत स्वच्छ करावे. शेवटाच्या कुळवाच्या पाळीअगोदर 15 ते 20 गाड्या कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे.
ठिबक सिंचन संच उभारणी ः
पूर्वमशागत झाल्यावर शेताची पाहणी करून आराखडा तयार करावा. आराखड्याप्रमाणे ठिबक संचाची उभारणी करावी. पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. कापूस पिकासाठी ड्रीपरचा प्रवाह चार लिटर प्रति तास असलेल्या 12 किंवा 16 मि.मी. इनलाईन नळीची निवड करावी. इनलाईन नळीच्या दोन ड्रीपरमधील अंतर 60 सें.मी. किंवा 90 सें.मी. असावे. ठिबक सिंचन पद्धतीत जोडओळ पद्धत किंवा पट्टा पद्धतीचा अवलंब करावा, त्यामुळे प्रति हेक्‍टरी झाडांची संख्या कायम राहून खर्चात बचत होते, तसेच पीक फवारणी, आंतरमशागत व कापूस वेचणी ही कामे सोईस्कर राबविता येतात.
लागवड व्यवस्थापन ः
ठिबक सिंचन आधारित पूर्वहंगामी कापसाची लागवड करण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातींची निवड करावी. बी.टी. कापसाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या व जास्त फळफांद्या असणाऱ्या जातीची निवड करावी. लागवड करताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, जाती इ. बाबींचा विचार करावा. लागवडीसाठी बियाणे लावण्यापूर्वी (पेरणीपूर्वी) 12 ते 14 तास ठिबक संच चालवून शेतात वाफसा होईपर्यंत ओलावा निर्माण करावा. नंतर शिफारस केलेल्या अंतरावर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 60 ते 120 ु 90 सें.मी. किंवा 90 ते 180 ु 105 ते 120 सें.मी. अशा अनेक जोडओळ किंवा पट्टा पद्धतीने ठिबक संचालगत लागवड करावी. लागवड करताना इनलाईन नळीचे ड्रीपर व बियाणे लागवडीची जागा जवळ येतील याची काळजी घ्यावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

वर्धा जिल्हा

भौगोलिक क्षेत्र:
वर्धा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशामध्ये 20°28′ एन. व 21°21′ एन. अक्षांश व 78°30′ ते 79°15′ रेखांश दरम्याने स्थित आहे. हा पश्चिम व उत्तरेला अमरावती जिल्हा, पूर्वेला नागपूर जिल्हा, दक्षिणेला यवतमाळ जिल्हा व दक्षिण-पूर्वेला चंद्रपूर जिल्हा द्वारे सीमित आहे. जिल्ह्याची अधिकतम लांबी 125 किमी. आहे व दक्षिण टोकावर ह्याची रुंदी जवळपास 58 किमी. आहे.

जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 628900 हेक्टर आहे, जे राज्याचे 2.06% क्षेत्र आहे. वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय आहे व तो रस्ते व रेल्वे जोडणी द्वारे जोडलेला आहे. जिल्ह्यामध्ये आठ तहसील किंवा विकास गट उदा. आष्टी, करंजा, आर्वी, सेलु, वर्धा, देओली, हिंगणघाट व समुद्रपूर इत्यादीचा अंतर्भाव आहे. हे अतिरिक्त 15 महसूल मंडळांमध्ये विभाजित आहेत, जे गावांच्या समूहांमध्ये विभाजित आहेत, ज्यांना “पतवारी हलकास” म्हणतात. जिल्ह्यामध्ये 1004 गावे आहेत.

तहसिल एकूण क्षेत्रफळ जंगल व्याप्त क्षेत्र ओलीत क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र बिगर शेती वापराखालील जमीन लागवडी लायक नसलेली जमीन
आर्वी 67932.00 4337.97 2098.68 42604.01 9931.46 8952.53
आष्टी 31570.00 3553.43 1855.02 16456.26 2175.89 7481.59
कारंजा 55872.00 7370.32 2554.25 35564.06 5227.02 5138.75
सेलू 58857.00 3602.73 4449.07 36388.75 7014.01 7244.21
वर्धा 69366.00 299.72 2773.98 47321.19 9163.43 9379.27
देवळी 59318.00 108.79 1175.41 43761.39 7500.74 6911.14
हिंगणघाट 80165.00 1711.15 2484.54 61492.52 5740.11 8606.83
समुद्रपुर 79714.00 2709.75 3273.20 58016.47 6148.21 9668.95

पीक भूमि उपयोग:
कोष्टक दर्शविते की, जिल्ह्याच्या एकूण लागवड योग्य क्षेत्रामध्ये कापूस अधिक महत्वपूर्ण पीक म्हणून दिसून येते आहे. कापूस बदलाअंतर्गत क्षेत्र विविध तहसीलांमध्ये 27-14% आहे. हिंगणघाट, वर्धा व आर्वीच्या प्रत्येकी 26% नंतर देवळीचे उच्चतम क्षेत्र 27% आहे. वर्धा (10%) नंतर जवार अंतर्गत क्षेत्र आर्वी (11%) मध्ये उच्चतम आहे. बाकी तहसीलांमध्ये 5-6% क्षेत्र आहे. महत्वपूर्ण कडधान्य पीक पिजनपिया आहे, ज्याने 4-6% दरम्याने क्षेत्र व्यापले आहे. देवळीचे उच्चतम क्षेत्र 7% आहे. गहू अंतर्गत क्षेत्र विविध तहसीलांमध्ये 2-3% दरम्याने भरपूर कमी श्रेणीत आहे. इतर पीकांनी विविध तहसीलांमध्ये पुष्कळ छोटे क्षेत्र व्यापले आहे. हरभरा, भुईमूग समाविष्ट इतर महत्वपूर्ण पीके तीळ बाजरी व ऊस आहेत. फळे व भाजीपाला अंतर्गत क्षेत्र 1-3% दरम्याने आहे. ह्या प्रकारांतर्गत हिंगणघाट व देवळी तहसीलांमध्ये कमी क्षेत्र आहे. ह्या प्रकारांतर्गत आष्टी व करंजा येथे जवळपास 3% क्षेत्र आहे.

गहू जवार बाजरी हरभरा तूर मूग उडीद मटकी ऊस मिरची फळे व भाजीपाला कापूस भुईमूग तिळ सोयाबीन
वर्धा 1029 3175 24 642 2209 63 40 19 18 11767 1545 11767 423 42 3532
सेलु 2420 3661 5 1549 2491 168 227 29 10685 2355 10685 2227 43 11353
समुद्रपूर 1179 10394 15 483 5649 142 12 20 365 25295 1288 25295 216 64 4161
हिंगणघाट 3312 5246 1569 4919 56 11 30 1577 21343 1194 21343 202 93 8130
देवळी 2704 12200 915 6315 123 367 623 30118 1035 30118 41 228 3936
आर्वी 79 6659 43 1396 7437 171 81 27048 55 27048 21 104 6684
आष्टी 402 6341 13 3175 8314 84 16 117 11 36967 132 36967 3 384 15181
करंजा 2374 7321 7104 6153 10 91 79 133 26718 934 26718 243 23619

लोकसंख्या:
वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या 638990 पुरुष व 597746 महिलांना समाविष्ट करुन 12,36,736 (जनगणना 2001) आहे (प्रत्येक 1000 पुरुषां करिता येथे 935 महिला आहेत). 1991 ते 2001 पर्यंत मागील दहा वर्षांमध्ये लोकसंख्या 12.83% वाढली आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्या घनतेमध्ये वाढ झाली आहे. वर्ष 2001 मध्ये लोकसंख्या घनता 196/चौ. कि.मी. होती. तहसील अनुसार लोकसंख्या खाली दिलेली आहे.

तहसिल कुट्रंबाची संख्या लोकसंख्या अनुसुचित जाती अनुसुचित जमाती
एकूण पुरुष स्रिया एकूण पुरुष स्रिया एकूण पुरुष स्रिया
आर्वी 23,361 102,923 53,073 49,850 13,469 6,919 6,550 19,855 10,194 9,661
आष्टी 16,156 73,594 38,037 35,557 8,869 4,647 4,222 9,333 4,805 4,528
कारंजा 19,735 88,720 45,592 43,128 7,648 3,954 3,694 13,454 6,925 6,529
सेलू 26,448 120,026 61,720 58,306 12,586 6,548 6,038 20,356 10,442 9,914
वर्धा 41,927 187,865 97,174 90,691 23,777 12,221 11,556 20,846 10,880 9,966
देवळी 23,263 102,814 52,977 49,837 17,981 9,271 8,710 15,315 7,813 7,502
हिंगणघाट 26,730 120,136 62,035 58,101 15,448 8,002 7,446 14,483 7,510 6,973
समुद्रपुर 25,343 115,617 60,002 55,615 12,367 6,482 5,885 19,124 9,940 9,184
 


हवामान हंगाम :

जिल्ह्याचे हवामान दक्षिणपश्चिम पावसाळा हंगाम वगळून संपूर्ण वर्ष भरपूर उन्हाळा व साधारण कोरडे हवामान द्वारे वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर्ष चार हंगामांमध्ये विभागलेले राहिल. हिवाळा डिसेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत आहे. उष्ण हंगाम मार्च पासून ते जूनच्या मध्यापर्यंत आहे. हे सर्व दक्षिणपश्चिम पावसाळा हंगामा मागोमाग येते, जो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. शेष ऑक्टोबर व नोव्हेंबर उत्तर पावसाळा घटित करतो. जिल्हा -22.27 च्या ओलावा निर्देशांका सोबत दमट (कोरडे) मेगाथर्मल हवामानांतर्गत वर्गीकृत आहे. येथे सरासरी 900 मिमी. पाऊस पडतो, ज्यामधील 80 टक्के जुलै ते सप्टेंबर दरम्याने पडतो. तथापि, ऑक्टोबर ते मे दरम्याने कालावधी कोरडा व तुटीचा आहे. म्हणून ह्या कालावधी दरम्याने पिकविण्यात येणा-या पिकांना सिंचनाची गरज असते.

सौर विकिरण, तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता व वारा गती आणि संचालन समाविष्ट हवामानाचे मूलतत्त्व. जास्तीत जास्त अभिक्रियांकरिता उपलब्ध पाणी हवामानासंबंधी जल संकल्पनेमध्ये निरुपित आहे. हवामानासंबंधी जल समतोलामध्ये पर्जन्यमान व रोप छताद्वारे प्रभावित बाष्पीकरण व बाष्प निष्कासन करण्यामुळे जल हानी द्वारे मुख्यत: पाण्यामध्ये वृद्धि दरम्याने अंतर आहे.

महिना पाऊस (मिमी.) पीइटी (मिमी.) एइटी (मिमी.) डब्ल्यूडी (मिमी.) डब्ल्यूएस (मिमी.)
जानेवारी 18.40 810.00 19.10 790.90 0.00
फेब्रुवारी 8.99 100.29 8.99 91.30 0.00
मार्च 13.14 144.60 13.15 131.45 0.00
एप्रिल 6.09 170.90 6.09 164.81 0.00
मे 6.98 201.70 6.98 194.72 0.00
जून 185.70 169.60 169.60 0.00 0.00
जुलै 222.91 110.30 110.30 0.00 0.00
ऑगस्ट 225.88 102.10 102.10 0.00 52.49
सप्टेंबर 145.16 107.00 343.20 726.80 0.00
ऑक्टोबर 58.11 112.20 58.57 53.63 0.00
नोव्हेंबर 10.76 86.70 11.24 75.46 0.00
डिसेंबर 0.84 73.20 1.15 72.05 0.00
एकूण 902.96 2,188.59 850.47 2,301.12 52.49
पीइटी : संभाव्य बाष्प निष्कासन, एइटी : वास्तविक बाष्प निष्कासन, डब्ल्यूडी : जल तुट, डब्ल्यूएस : पाणी पुरवठा
टिप्पणी : विविध निर्देशांकांच्या भाषेत हवामानासंबंधी अस्थिरता पीक वृद्धि करिता उपलब्ध माती ओलाव्याचे अनुमान काढण्याकरिता मदत करेल. थॉर्नथवेट (1948) व थॉर्नथवेट व माथर (1957) पद्धत हवामानासंबंधी जल समतोल पृथक्करण करण्याकरिता येथे उपयोगात आणण्यात येते. ही एकूण पर्जन्य (पाणी पुरवठा) व बाष्प निष्कासन (पाणी आवश्यकता) वर आधारित आहे. जेव्हा एकूण पर्जन्य पाणी आवश्यकतेपेक्षा अधिक असेल, तेव्हा तेथे साठवण, लीचिंग व खोल झरण करिता अधिक पाणी आहे, परंतु जेव्हा पाणी पुरवठा पाणी आवश्यकते पेक्षा कमी पडेल, तेव्हा तो सरळ मार्ग सोडून जाणारा आहे.

पर्जन्यमान :
वर्धा जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान वितरण दर्शविते की, जिल्ह्याच्या दक्षिणी हिस्स्यांना उत्तरी हिस्स्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान (पाऊस) प्राप्त होते. समुद्रपूर व हिंगणघाट येथे 1132 मिमी. उच्चतम सरासरी पाऊस पडतो, तर देओली, वर्धा व सेलु येथे 1099 मिमी. पावसाची नोंद होते. आष्टी, आर्वी व करंजा सहित उत्तरी हिस्स्यांमध्ये 979 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. माह अनुसार वितरण प्रतिबिंबित करते की, मुख्यत: जून ते ऑक्टोबर दरम्याने पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगणघाट येथे 493 मिमी., समुद्रपूर येथे 391 मिमी., वर्धा येथे 344 मिमी. व देओली येथे 319 मिमी. पावसासोबत उच्चतम पाऊस पडतो. नोव्हेंबर ते मे दरम्याने पाऊस भरपूर कमी आहे व ओलावा शेती करिता उपलब्ध नाही आहे. तुलनात्मकदृष्ट्या उच्च पावसासोबत दक्षिणी हिस्से उपलब्ध ओलाव्यासोबत खरीप पिकांना आधार देतील.
हवामान हंगाम :

जिल्ह्याचे हवामान दक्षिणपश्चिम पावसाळा हंगाम वगळून संपूर्ण वर्ष भरपूर उन्हाळा व साधारण कोरडे हवामान द्वारे वैशिष्ट्यपूर्ण आहे. वर्ष चार हंगामांमध्ये विभागलेले राहिल. हिवाळा डिसेंबर पासून ते फेब्रुवारी पर्यंत आहे. उष्ण हंगाम मार्च पासून ते जूनच्या मध्यापर्यंत आहे. हे सर्व दक्षिणपश्चिम पावसाळा हंगामा मागोमाग येते, जो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. शेष ऑक्टोबर व नोव्हेंबर उत्तर पावसाळा घटित करतो. जिल्हा -22.27 च्या ओलावा निर्देशांका सोबत दमट (कोरडे) मेगाथर्मल हवामानांतर्गत वर्गीकृत आहे. येथे सरासरी 900 मिमी. पाऊस पडतो, ज्यामधील 80 टक्के जुलै ते सप्टेंबर दरम्याने पडतो. तथापि, ऑक्टोबर ते मे दरम्याने कालावधी कोरडा व तुटीचा आहे. म्हणून ह्या कालावधी दरम्याने पिकविण्यात येणा-या पिकांना सिंचनाची गरज असते.

सौर विकिरण, तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता व वारा गती आणि संचालन समाविष्ट हवामानाचे मूलतत्त्व. जास्तीत जास्त अभिक्रियांकरिता उपलब्ध पाणी हवामानासंबंधी जल संकल्पनेमध्ये निरुपित आहे. हवामानासंबंधी जल समतोलामध्ये पर्जन्यमान व रोप छताद्वारे प्रभावित बाष्पीकरण व बाष्प निष्कासन करण्यामुळे जल हानी द्वारे मुख्यत: पाण्यामध्ये वृद्धि दरम्याने अंतर आहे.

महिना पाऊस (मिमी.) पीइटी (मिमी.) एइटी (मिमी.) डब्ल्यूडी (मिमी.) डब्ल्यूएस (मिमी.)
जानेवारी 18.40 810.00 19.10 790.90 0.00
फेब्रुवारी 8.99 100.29 8.99 91.30 0.00
मार्च 13.14 144.60 13.15 131.45 0.00
एप्रिल 6.09 170.90 6.09 164.81 0.00
मे 6.98 201.70 6.98 194.72 0.00
जून 185.70 169.60 169.60 0.00 0.00
जुलै 222.91 110.30 110.30 0.00 0.00
ऑगस्ट 225.88 102.10 102.10 0.00 52.49
सप्टेंबर 145.16 107.00 343.20 726.80 0.00
ऑक्टोबर 58.11 112.20 58.57 53.63 0.00
नोव्हेंबर 10.76 86.70 11.24 75.46 0.00
डिसेंबर 0.84 73.20 1.15 72.05 0.00
एकूण 902.96 2,188.59 850.47 2,301.12 52.49
पीइटी : संभाव्य बाष्प निष्कासन, एइटी : वास्तविक बाष्प निष्कासन, डब्ल्यूडी : जल तुट, डब्ल्यूएस : पाणी पुरवठा
टिप्पणी : विविध निर्देशांकांच्या भाषेत हवामानासंबंधी अस्थिरता पीक वृद्धि करिता उपलब्ध माती ओलाव्याचे अनुमान काढण्याकरिता मदत करेल. थॉर्नथवेट (1948) व थॉर्नथवेट व माथर (1957) पद्धत हवामानासंबंधी जल समतोल पृथक्करण करण्याकरिता येथे उपयोगात आणण्यात येते. ही एकूण पर्जन्य (पाणी पुरवठा) व बाष्प निष्कासन (पाणी आवश्यकता) वर आधारित आहे. जेव्हा एकूण पर्जन्य पाणी आवश्यकतेपेक्षा अधिक असेल, तेव्हा तेथे साठवण, लीचिंग व खोल झरण करिता अधिक पाणी आहे, परंतु जेव्हा पाणी पुरवठा पाणी आवश्यकते पेक्षा कमी पडेल, तेव्हा तो सरळ मार्ग सोडून जाणारा आहे.

पर्जन्यमान :
वर्धा जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान वितरण दर्शविते की, जिल्ह्याच्या दक्षिणी हिस्स्यांना उत्तरी हिस्स्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान (पाऊस) प्राप्त होते. समुद्रपूर व हिंगणघाट येथे 1132 मिमी. उच्चतम सरासरी पाऊस पडतो, तर देओली, वर्धा व सेलु येथे 1099 मिमी. पावसाची नोंद होते. आष्टी, आर्वी व करंजा सहित उत्तरी हिस्स्यांमध्ये 979 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. माह अनुसार वितरण प्रतिबिंबित करते की, मुख्यत: जून ते ऑक्टोबर दरम्याने पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये हिंगणघाट येथे 493 मिमी., समुद्रपूर येथे 391 मिमी., वर्धा येथे 344 मिमी. व देओली येथे 319 मिमी. पावसासोबत उच्चतम पाऊस पडतो. नोव्हेंबर ते मे दरम्याने पाऊस भरपूर कमी आहे व ओलावा शेती करिता उपलब्ध नाही आहे. तुलनात्मकदृष्ट्या उच्च पावसासोबत दक्षिणी हिस्से उपलब्ध ओलाव्यासोबत खरीप पिकांना आधार देतील.
माती व तिची वैशिष्टये
माती: जिल्ह्याचे जवळपास संपूर्ण क्षेत्र काळवथरी दगडाच्या एका स्तरावर काळ्या किंवा गडद तपकिरी मातीच्या एका पातळ आवरणाचे बनलेले आहे. माती पूर्णपणे सुपीक आहे व चांगली कापूस व जवार पीके घेण्या करिता सक्षम आहे. माती आकारः ही काही इंचांपासून ते दहा फुटा पर्यंत बदलते (सरासरी सांद्रता 2 फुट आहे).
मातीचे प्रकार:
1.       उथळ माती: ही हिंगणघाट तहसीलचा पूर्वी भाग, वर्धा तहसीलचा उत्तरी भाग व आर्वी तहसीलचा मध्य भाग येथे आढळते.
2.       मध्यम माती: ही हिंगणघाट तहसीलचा पश्चिमी भाग व आर्वी तहसीलचा पश्चिमी भाग येथे आढळते.
कापसाकरिता चांगली माती आर्वी तहसील मध्ये वर्धा नदीच्या पूर्वी तटाच्या बाजूने आढळते.
मातीचे प्रकार:
जिल्ह्याची माती चार मुख्य प्रकार उदा. काळी, मोरंड, खरडी व बरडी अंतर्गत समूहबद्ध करता येईल.
1. काळी किंवा सुपीक काळी माती: ही माती वर्धाचा मोठा हिस्सा व्यापते व बहुधा आर्वी व हिंगणघाट येथे आढळते. ही माती ओलावा टिकवून ठेवण्याची उत्कृष्ट शक्ती धारण करते व जेव्हा खरीप पिकां करिता हवामान व जलनिःसारण योग्य आहे, तेव्हा ती पूर्णपणे अधिक चांगले उत्पन्न देते. काळी माती मध्ये नांगरणी करणे पुष्कळ अवघड आहे. परिणामस्वरुप ह्यामध्ये गहू पिकविणे पुष्कळदा एक लहान गवत आहे. रबी कडधान्ये उदा. मसूर, वाटाणा व तीवरा करिता काळी एक आवडती माती आहे.
2. मोरंडः मोरंड एक काळी किंवा गडद तपकिरी माती आहे, जी सर्वसाधारणपणे चुनखडी कणासोबत मिश्रित असते. ही मोठ्या कणांची रचना आहे, जी एकमेका सोबत पुष्कळ जवळ चिकटून राहत नाही. हिची ढेकूळे कमी टणक असतात व जेव्हा ती संपृक्त असते, तेव्हा ती बारीक चिखलामध्ये परिवर्तित होत नाही, उलटपक्षी शुष्क हवामानामध्ये ती कमी तडकते. ही वैनगंगा माळाची श्रेष्ठ गहू माती आहे.
3. खरडी व बरडीः खरडी व बरडी मातींचा हलका प्रकार आहे व बहुधा वर्धा जिल्ह्याच्या पूर्वी व उत्तरी भागा मध्ये आढळते. त्यांची खोली तीन इंचां पेक्षा कमी आहे. खरडी, जी जास्त विनिर्दिष्ट आहे वाळू सोबत मिश्रित निकृष्ट व उथळ गडद माती आहे. बरडी दगडां सोबत पसरलेली डोंगराळ जमीन आहे.
4. इतर माती: रेटरी (नियमित रेताड माती) व केचर (जलोढीय) माती ओढ्यांच्या तटांवर अर्थशून्य परिमाणांमध्ये आढळते.
जमीनीचा चांगला प्रकार स्थानिक रीत्या गहरी किंवा गहू-जमीन रुपात ज्ञात आहे, परंतु दुर्दैवाने वर्धा मध्ये एक मानक पीक रूपात गव्हाची निवड असमाधानकारक आढळून आली होती व जवार, ज्याचा कापूस वगळून जिल्ह्यामध्ये पिकविण्यात येणा-या सर्व पिकांमध्ये पहिला क्रमांक आहे, त्याच्या जागेवर गव्हाचे उत्पन्न घेण्यात आले आहे.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

उझी माशीचा प्रादुर्भाव

ढगाळ वातावरणामुळे रेशीम कीटकांवर उझी माशी या उपद्रवी किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. या माशीची माहिती व त्यावर करावयाच्या उपायांविषयी माहिती करून घेऊ.
उझी माशी ही उपद्रवी कीड असून, तिच्या प्रादुर्भावामुळे अनेक देशांमध्ये नुकसान होत असल्याचे दिसून येते. देशात कर्नाटकच्या शेजारील राज्ये आंध्र प्रदेश व तमिळनाडू या ठिकाणी सन 1981-82च्या दरम्यान या माशीचा प्रादुर्भाव व प्रसार झाला. गेल्या काही महिन्यांपासून काही जिल्ह्यांमध्ये उझी माशीचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झालेली आहे. उझी माशीच्या प्रादुर्भावामुळे जवळपास 10 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. साधारणपणे जून ते जानेवारी या महिन्यांत उझी माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.
या माशीच्या जीवनचक्रातील अंडी, मॅगट, प्युपा, माशी या चार अवस्था आहेत. नर उझी माशी मादी उझी माशीच्या तुलनेत आकाराने मोठी असते. पाठीवर गडद काळ्या रंगाचे चार उभे पट्टे असतात. ही माशी 300 ते 1000 पर्यंत अंडी घालू शकते. ही माशी शक्‍यतो चॉकी अवस्थेतील रेशीम कीटकांवर अंडी घालण्याचे टाळते, तर आकाराने मोठ्या असलेल्या प्रौढ रेशीम कीटकांना भक्ष्य बनवते. अंडे घातल्यापासून एक-दोन दिवसांत अंड्यातून मॅगट बाहेर येतो, ज्याचा रंग पिवळसर पांढरा असतो. मॅगट रेशीम कीटकाच्या नाजूक त्वचेला छिद्र पाडून कीटकाच्या शरीरात प्रवेश करतो. ज्या ठिकाणाहून तो प्रवेश करतो, त्या ठिकाणी काळ्या रंगाचा डाग दिसून येतो. परिपूर्ण वाढ झालेला क्रीम व्हाइट रंगाचा मॅगट संगोपनगृहातील रॅकमध्ये, जमिनीला असलेल्या भेगांमध्ये अथवा कीटक संगोपनगृहातील कोपऱ्यांमध्ये अंधाऱ्या जागी वाटचाल करतो. या ठिकाणी त्याची पुढील प्युपा अवस्था सुरू होते. प्युपा अवस्था 10 ते 12 दिवसांची असते. प्युपाचा आकार लंबगोलाकार/दंडाकृती असून, प्रौढ प्युपाचा रंग गडद तपकिरी असतो. या प्युपामधून मादीच्या तुलनेत नर उझी माशी अगोदर बाहेर येते. उझी माशीचा जीवनाचा कालावधी 17 ते 18 दिवसांचा असतो. या एकूण कालावधीपैकी चवथ्या ते सातव्या दिवसांपर्यंत मोठ्या प्रमाणात अंडी घालते. नर माशीपेक्षा मादी माशीचा जीवनकाल अधिक असतो. उझी माशी 1000 ते 2000 मीटरपर्यंत उडू शकते
नियंत्रण
भौतिक, रासायनिक व जैविक उपायांनी नियंत्रण करणे शक्‍य आहे.
भौतिक उपाय – कीटक संगोपनगृह, कोष खरेदीकेंद्र, अंडीपुंजनिर्मिती केंद्र, रेशीम धागानिर्मिती केंद्र इ. ठिकाणांवरील मॅगट व प्युपा गोळा करून जाळून नष्ट करावा किंवा 0.5 टक्के साबणाच्या द्रावणात नष्ट करावा. जमिनींना असलेल्या भेगा बुजवून घ्याव्यात. उझी माशीच्या प्रादुर्भावास बळी पडलेले रेशीम कीटक गोळा करून नष्ट करावेत.
पाचव्या अवस्थेतील रेशीम कीटकांस प्रादुर्भाव झाला असेल, तर असे प्रादुर्भावित रेशीम कीटक इतर रेशीम कीटकांच्या तुलनेत दोन दिवस अगोदर कोष बांधतात. असे कोष मॅगट बाहेर येण्यापूर्वीच गोळा करून त्यांवर कोष ड्राय करण्याची प्रक्रिया करावी, ज्यामुळे कोषातील मॅगट मरून जाईल व कोषांचे नुकसान होणार नाही. उझी माशीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणावरून कोष, मॅगट, प्युपा येणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या गावांतील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या एक-दीड महिना पीक बंद ठेवावे, ज्यामुळे उझी माशीच्या जीवनचक्रात निसर्गतःच अडथळा निर्माण होऊन तिच्या प्रसारावर नियंत्रण मिळविता येईल. कीटक संगोपनगृहाच्या खिडक्‍या व तावदाने इत्यादींना नायलॉन जाळीने झाकून घ्यावे, यामुळे जवळपास 20 ते 22 टक्के नियंत्रण मिळविता येते. चॉकी ट्रे, तसेच रॅक नायलॉन जाळीने झाकून ठेवावे, यामुळे उझी माशीला अंडी घालणे शक्‍य होणार नाही.
किडीची लक्षणे
रेशीम कीटकाच्या शरीरावर लहान एक ते दोन अंडी असणे किंवा रेशीम कीटकाच्या त्वचेवर काळ्या रंगाचा डाग असणे किंवा कोषाला छिद्र पाडून मॅगट बाहेर आलेला असणे.
उझी माशीचा प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या तिसऱ्या अवस्थेत झालेला असल्यास रेशीम कीटक कोषावस्थेपूर्वीच मृत होताना आढळतात, जर प्रादुर्भाव रेशीम कीटकाच्या पाचव्या अवस्थेत झालेला असेल, तर पोचट कोषांची निर्मिती होते. होणारे नुकसान 10 ते 30 टक्के असते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

हरळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी

संत्रा बागेत हरळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, नियंत्रणासाठी ग्लायफोसेटची फवारणी करावी का? काय काळजी घ्यावी?
परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ प्रा. आनंद गोरे यांनी दिलेली माहिती ः हरळी हे खूप काटक असे तण आहे. ते एकदा का शेतात वाढू लागले, की त्याचे नियंत्रण करणे अवघड होते. वाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत असेल तर तणनाशकाने नियंत्रण होते; मात्र त्यानंतर शेतात पाणी दिले, की हरळी पुन्हा वाढू लागते. शेतात हरळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर करून या तणाचे नियंत्रण होऊ शकते; मात्र त्याचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
फवारणीवेळी ही काळजी घ्या…
बागेत फवारणी करताना पंपाला हूड लावूनच फवारणी करावी. तणनाशक झाडाच्या जवळपास किंवा हिरव्या भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. शेतात पाणथळ जागा राहणार नाही याकडे लक्ष द्यावे. तण हे लुसलुशीत व चार ते पाच पानांवर असावे. तणांच्या प्रादुर्भावानुसार हेक्‍टरी दोन ते चार लिटर ग्लायफोसेट प्रति 500-600 लिटर पाण्यातून फवारावे. फ्लॅट नोझलचा वापर करावा. फवारणी स्वच्छ सूर्यप्रकाशात करावी. ढगाळ वातावरणात करू नये. फवारणीनंतर 21 दिवसांपर्यंत शेताची मशागत करू नये. तणांच्या उगवणीपूर्वी बागेत ऍट्राझीन हे तणनाशक दीड ते तीन लिटर प्रति हेक्‍टरी फवारल्यास चांगले नियंत्रण मिळते.


कोणतीही कंपनी जेव्हा एखादे कीटकनाशक, बुरशीनाशक वा तणनाशक किंवा अन्य कोणतेही रसायन संशोधित करते त्या वेळी तेथील प्रयोगशाळेत त्याच्या चाचण्या घेऊन जे ज्या गोष्टीसाठी कार्य करते त्यासंबंधीची जैविक क्षमता तपासली जाते. याला इंग्रजीत बायो इफिकसी म्हणतात. मात्र या उत्पादनाची जैविक क्षमता केवळ प्रयोगशाळेपुरतीच नव्हे तर प्रत्यक्ष शेतातही तपासून सिद्ध व्हावी लागते. त्यासाठी विविध कृषी हवामान विभागांमध्ये व हंगामांमध्ये म्हणजे भारतात त्याच्या प्रायोगिक चाचण्या घ्याव्या लागतात. कृषी विद्यापीठे किंवा संशोधन केंद्रांतून या चाचण्या संबंधित कंपनीमार्फत घेतल्या जातात. त्याला “मल्टीलोकेशनल्स फील्ड ट्रायल्स’ असे म्हणतात. या चाचण्यांव्यतिरिक्त पशु-पक्षी, जलाशय, मासे, किंवा एकूणच पर्यावरणासाठी हे उत्पादन सुरक्षित आहे का त्यासंबंधीच्या किंवा त्याच्या विषारीपणाबाबतच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतर सर्व चाचण्यांचा हा अहवाल सीआयबीआरसीकडे सुपूर्त केला जातो. त्यानंतर या संस्थेमार्फत त्याचा अभ्यास होऊन कीडनाशकाच्या विक्रीला कायदेशीर वा अधिकृत मंजुरी दिली जाते. आता हे उत्पादन शेतकरी वापरणार असल्याने त्या उत्पादनाविषयी आवश्‍यक ती माहिती त्याच्या पॅकिंगवर किंवा बाटलीवर लिखित स्वरूपात छापणे अत्यावश्‍यक असते. त्याला लेबल असे म्हणतात. या लेबलमध्ये कोणती माहिती संबंधित कंपनीने देणे गरजेचे आहे त्याचे काही नियम वा निकष ठरवून दिलेले असतात. आता या कीडनाशकाची वा उत्पादनाची शिफारस ज्या पिकावरील ज्या किडीसाठी, ज्या मात्रेत (डोस) करण्यात आली आहे ती माहिती म्हणजेच लेबल क्‍लेम होय.
उत्पादनासोबत कंपनी एक छोटी घडीपत्रिका किंवा माहितीपत्रिका देते. त्यात हे लेबल क्‍लेम दिलेले असतात. (तुम्ही लीफलेट उघडून पाहा. त्यात कीडनाशकाचे नाव, सक्रिय घटक, कोणकोणत्या पिकांवर, कोणकोणत्या किडी-रोग वा तणांचे नियंत्रण), वापरण्याची मात्रा व डोस, पाणी याचा एक तक्ता वा कोष्टक दिलेले असते. ही माहिती म्हणजेच लेबल क्‍लेम.
उदा. कंपनीने या कोष्टकात आपल्या कार्बेन्डॅझीम या उत्पादनाचा (बुरशीनाशक) डोस भुईमुगावरील टिक्का रोगासाठी प्रति हेक्‍टरी प्रति 600 लिटर पाण्यासाठी 225 ग्रॅम आहे असे जेव्हा लिहिलेले असते त्याचा अर्थ भुईमूग पिकावर टिक्का रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डॅझीम या बुरशीनाशकाचा लेबल क्‍लेम आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच विविध चाचण्यांतून पार पडल्यानंतर शास्त्रीय कसोटींवर आधारित सिद्ध झालेली किंवा करण्यात आलेली ही अधिकृत शिफारस होय. आता पॅकिंगवर लेबलच्या स्वरूपात जी माहिती कंपनी उपलब्ध करते त्याचे विस्तृत विवरण घडीपत्रिकेत असते. त्याला इंग्रजीत लीफलेट असे म्हणतात. प्रत्येक उत्पादनासोबत प्रत्येक कंपनी हे लिफलेट देते. पॅकिंगवरील माहितीवर कंपनीने असे लिहिलेलेच असते की अधिक माहितीसाठी लिफलेट वाचावे. मात्र अनेकवेळा बाटली एकीकडे, लीफलेट दुसरीकडे अशी विक्री केंद्रावर परिस्थिती असते. कोणत्याही परिस्थितीत बाटली किंवा उत्पादनाचा पुडा यासोबत दोन गोष्टी घेतल्याशिवाय शेतकऱ्याने दुकान सोडू नये. 1)खरेदीची पक्की पावती 2) लीफलेट (लेबलचे माहितीपत्रक वा घडीपत्रक)
लीफलेट घरी जाऊन सविस्तर वाचावे. अनेकवेळा लीफलेटवरील माहिती अत्यंत बारीक अक्षरात लिहिलेली असते, त्यामुळे ती डोळ्यांनी सहजासहजी वाचणे कठीण जाते. अशा वेळी चांगल्या दर्जाच्या भिंगाचा वापर करावा. शेतात किडींचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे भिंग असावेच लागते. त्याचा वापर करावा. लीफलेट कायम जपून ठेवावे. आपल्यासोबत अन्य शेतकऱ्यांनाही लेबल क्‍लेमचे महत्त्व समजावून द्यावे.
लेबल क्‍लेममुळे काय फायदे होतात?
शेतकऱ्याला त्या उत्पादनाच्या गुणवत्तेविषयी कायदेशीर हमी वा संरक्षण मिळते.
देशभरात विविध ठिकाणी (कृषी विद्यापीठे वा संशोधन संस्था) संबंधित कीडनाशकाच्या चाचण्या घेतलेल्या असतात. त्यामुळे सर्वत्र त्याची जैविक क्षमता तपासून मगच त्याची अधिकृतरीत्या ती शिफारस असते.
लेबल क्‍लेमद्वारे संबंधित कीडनाशकाची केवळ मात्रा, वापरण्याची वेळ निश्‍चित होते असे नाही, तर संबंधित पीक, मानव, पर्यावरण, मित्रकीटक, जनाव, जलाशय,मासे आदी घटकांवर कीडनाशकाच्या होणाऱ्या परिणामांच्या चाचण्या तपासलेल्या असतात. त्यानंतर ते सुरक्षित वापरासाठी घोषित करण्यात येते.
लेबल क्‍लेममधून “पीएचआय’ शेतकऱ्यांना समजून येतो. ज्यावरून पुढे “एमआरएल’ मिळवणे शक्‍य होते.
एखादे कीडनाशक वा कोणतेही रसायन आपण स्वतःच्याच निर्णयाने जर एखाद्या पिकावर वापरले तर त्याचा त्या पिकावर किंवा पाने, कळ्या, मोहोर, फळांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. लेबल क्‍लेम मिळालेल्या रसायनाच्या अशा चाचण्या घेतल्या असल्याने तो धोका टळला जाऊ शकतो.
लेबल क्‍लेममुळे एखाद्या रसायनाची चुकीची शिफारस करण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याची दिशाभूल वा फसवणूक होणे टळू शकते.




  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

सोयाबीन

सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, नियंत्रणासाठी कोणते उपाय करावेत?

पावसाळा सुरू असल्याने या वातावरणात गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. गोगलगायी घास, द्राक्ष, वाल, कारली, भोपळा, काकडी, टोमॅटो, लसूण, मिरची, भुईमूग, भेंडी, फुलकोबी, सोयाबीन इत्यादी पिकांची रोपे कुरतडतात. पावसाळ्यात त्या चारीलगत, बांधालगत असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. अंड्यातून बाहेर आल्यानंतर सुरवातीच्या वाढीच्या काळात गोगलगायींचा खाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे सुरवातीच्या काळात पिकांचे जास्त नुकसान करतात.
एकात्मिक नियंत्रणाचे उपाय -
1) शेतालगतचे बांध स्वच्छ करावे. 2) गोगलगायी दिसताच चिमट्याने अथवा हाताने गोळा करून उकळलेल्या पाण्यात टाकून माराव्यात. 3) संध्याकाळी शेतामध्ये ठराविक अंतरावर गवताचे ढीग ठेवावेत व सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून त्यांचा नाश करावा, तसेच पिकांच्या मुळाशेजारी गोगलगायींनी घातलेली पिवळसर पांढऱ्या रंगाची (100 ते 150च्या पुंजक्‍यात) साबुदाण्याच्या आकाराची अंडी गोळा करून नष्ट करावीत. 5) दहा लिटर पाण्यात एक किलो गूळ मिसळावा व त्या द्रावणात गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी गोगलगायीग्रस्त शेतात ठराविक अंतरावर पसरावीत. गोगलगायी अशा पसरलेल्या पोत्यांखाली जमा होतात, सकाळ होताच त्यांचा वेचून नाश करावा. 6) सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खड्ड्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकावी. 7) जास्त उपद्रव असल्यास शेताभोवती दोन मीटर पट्ट्यात राख पसरून त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना 2ः3 या प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा किंवा बांधाच्या शेजारी तंबाखू अगर चुन्याच्या भुकटीचा चार इंच पट्टा टाकावा, त्यामुळे गोगलगायींना शेतात येण्यापासून अटकाव करता येईल. पाऊस पडत असल्यास या पद्धतीचा उपयोग होत नाही. 8) मेटाल्डीहाईड कीडनाशकाच्या गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत. प्रादुर्भाव असलेल्या शेतात संध्याकाळच्या वेळी पाच किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात शेतात टाकल्यास, त्या खाऊन गोगलगायी मरतात. 9) विषारी आमिष देऊनही गोगलगायी मारता येतात, त्यासाठी गव्हाचा किंवा भाताचा 50 किलो कोंडा दोन किलो गुळाच्या द्रावणामध्ये 10 ते 12 तास भिजवून ठेवावा. त्यामध्ये 25 ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल कीटकनाशकाची 50 ग्रॅम भुकटी मिसळून संध्याकाळी प्रादुर्भाव ग्रस्त क्षेत्रात प्रति हेक्‍टरी पसरून टाकावे. मिथोमिल हे
विषारी कीटकनाशक असल्यामुळे त्याचा वापर करताना प्लॅस्टिकचे हातमोजे घालावेत आणि नाका-तोंडावर कापड बांधावे. हे आमिष जनावरे व पाळीव प्राणी खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. 10) सामूहिक प्रयत्न केल्यास प्रभावी नियंत्रण होते.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

कापूस

कापूस पिकाला ठिबक संचाद्वारे पाणी व खते दिल्याने दोन्हींच्या खर्चात मोठी बचत होते. पिकाला गरजेनुसार पाणी देता येते. तसेच फर्टिगेशन पद्धतीने विद्राव्य खतांचा वापर करता येतो. ठिबक संचाची शेतात उभारणी करण्यापूर्वी त्यास आवश्‍यक त्या घटकांची पूर्तता करून खत व पाणी देण्याचे योग्य नियोजन करावे.

ठिबक संच शेतात उभारण्यापूर्वी पुढील आवश्‍यक घटकांची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे.

पूर्वमशागत ः संच उभारणीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. उभी/ आडवी नांगरट व वखराच्या पाळ्याद्वारे जमीन भुसभुशीत करावी. भुसभुशीत जमिनीत ठिबक सिंचनाचे पाणी योग्य रीतीने पसरते. कापूस लागवडीच्या अंतरानुसार ठिबक सिंचन संचाचा आराखडा व उभारणी करावी. ठिबक सिंचन संचाची निवड करताना तडजोड करू नये. संचामध्ये नळ्यांव्यतिरिक्त फिल्टर व प्रेशर गेज हे महत्त्वाचे घटक जरूर जोडावेत.

फिल्टर अतिशय महत्त्वाचा ः इनलाईन ठिबक नळ्या तयार होत असतानाच त्यांच्या आत ठिबक तोट्या बसविलेल्या असतात, त्यामुळे इनलाईन नळ्या वरून स्वच्छ करता येत नाहीत म्हणून या पद्धतीत फिल्टरची निवड जास्त महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो, मात्र पाण्याच्या गुणवत्तेनुसार इतरही फिल्टर बसविणे आवश्‍यक असते. विहिरीचे व बोअरचे पाणी असेल व कचऱ्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फिल्टर बसवावा. पाण्यामध्ये शेवाळे व तरंगणारे पदार्थ असतील, साचलेले पाणी असेल, तलावातील किंवा उघड्या शेततळ्यातील पाणी वापरायचे असल्यास वाळूचा फिल्टर असणे अत्यंत आवश्‍यक आहे, अन्यथा जाळीचा फिल्टर वारंवार चोक होऊन पाण्याचा पुरेसा प्रवाह संचास मिळत नाही. पाण्यातून वाळूचे, मातीचे, रेतीचे कण येत असल्यास हे कण संचात जाऊन ठिबक तोट्या बंद पडू शकतात. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याद्वारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसायक्‍लॉन फिल्टर वापरावा. या फिल्टरद्वारे वाळूचे कण जास्त घनता असल्यामुळे पाण्याच्या वेगाने फिल्टरच्या बाहेर भिंतीकडे फेकले जाऊन तळाशी जमा होतात. नंतर हे कण वेगळे काढता येतात. सिंचनाच्या पाण्यात घनपदार्थ, सेंद्रिय पदार्थ व विरघळलेले क्षार कमी प्रमाणात, परंतु एकत्रितपणे असल्यास डिस्क फिल्टरची निवड करावी. या फिल्टरमध्ये प्लॅस्टिकच्या चकत्या एका नळीवर एकमेकांना चिकटून बसविलेल्या असतात. या चकत्यांवर बारीक खाचा असतात. फिल्टरमध्ये शिरलेले पाणी दोन चकत्यांमधील खाचांतून स्वच्छ होऊन बाहेर पडते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज पडल्यास दोन वेगवेगळे फिल्टर (उदा. ः जाळीचा व वाळूचा) एकत्रितपणे संचास बसविणे फायद्याचे असते.

प्रेशर गेज आवश्‍यक ः
प्रत्येक शेतकऱ्याने प्रेशर गेज (दाबमापक) घेणे आवश्‍यक आहे. संचामध्ये कमीत कमी दोन प्रेशर गेज असावे. एक प्रेशर गेज मुख्य पाइपलाइनवर फिल्टरच्या पूर्वी व दुसरा फिल्टरच्या नंतर बसवावा. संचाच्या आखणीनुसार संच किती दाबावर चालवायचा, फिल्टर केव्हा स्वच्छ करायचा, व्हेंचुरीद्वारे खत मिश्रित पाणी किती सोडायचे यासाठी प्रेशर गेज असण्याची गरज आहे.

इनलाईन नळ्या, ड्रीपर्सची निवड ः
संच योग्य दाबावर (साधारणत: एक कि. ग्रॅ./ वर्ग सें.मी.) सुरू नसल्यास पाण्याचे वितरण समान होत नाही व संच चालविण्याचा कालावधी ठरविल्यास त्यात चुका होऊ शकतात. ठिबक संचातील इनलाईन नळ्यांची निवड काळजीपूर्वक करावी. या नळ्या १२ मि.मी. व १६ मि.मी. मध्ये उपलब्ध आहेत. १२ मि.मी. व्यासाची इनलाईन नळी स्वस्त असते; परंतु तिची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी असते. या नळ्या वापरल्यास सबमेनवरील खर्चात वाढ होते, त्यामुळे शेताच्या आराखड्यानुसार दोन्ही प्रकारच्या (१२/१६ मि.मी.) नळ्यांद्वारे होणाऱ्या खर्चाची तुलना करून व त्याचा समन्वय साधूनच त्यांची निवड करावी. दोन ड्रीपर्समधील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार निवडावे, कापसासाठी मध्यम जमिनीत दोन तोट्यांमधील अंतर ६० सें.मी. असते. तोट्यांतून बाहेर पडणारा प्रवाह साधारणत: २.२ ते ४.० लिटर प्रति तास असतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळे अधिक प्रवाहाच्या तोट्या उपयुक्त ठरतात, यामुळे संच चालविण्याचा कालावधी कमी होतो.

लक्षात घ्या कापसाची पाण्याची गरज ः
बीटी कापसास पावसाच्या खंडाच्या दरम्यान एक किंवा दोन दिवसाआड ठिबकने पाणी द्यावे. पाणी देताना त्या दोन-तीन दिवसांचे एकत्रित बाष्पीभवन जितके असेल त्याच्या ५० टक्के इतक्‍या खोलीचे पाणी द्यावे. प्रत्येक ठिबक तोटीद्वारे किती लिटर पाणी द्यायचे हे काढण्यासाठी त्या तोटीद्वारे किती क्षेत्र भिजवायचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. लागवडीनंतर सुरवातीच्या काळात झाडाच्या जवळचे क्षेत्रच भिजवायचे असल्यामुळे या वेळी पाण्याची गरज कमी असते.

समजा लागवडीतील अंतर ६० १२० सें.मी. इतके असेल तर प्रत्येक झाडाने व्यापलेले क्षेत्र ०.७२ चौ. मीटर इतके होईल. प्रत्येक झाडास एक तोटी दिलेली असल्यास व एकत्रित बाष्पीभवन आठ मि.मी. असल्यास प्रत्येक झाडास साधारण तीन लिटर पाणी दोन दिवसांनी द्यावे लागेल. ठिबकची तोटी चार लिटर प्रति तास प्रवाहाची असल्यास संच ४५ मिनिटे चालवावा लागेल. याप्रमाणे लागवडीचे अंतर व नळ्याची व ठिबक तोट्यांची मांडणी यानुसार संच चालविण्याचा कालावधी काढून संचाचे नियमन करता येईल. कापूस पिकाला हवामानानुसार सहा महिन्यांच्या कालावधीत ८०० ते ९०० मि.मी. पाण्याची गरज असते. कापसाच्या हंगामात या कालावधीत साधारण ४५० ते ५५० मि.मी. उपयुक्त पावसाची नोंद होते. त्यामुळे उरलेले ३०० ते ४०० मि.मी. पाणी ठिबक सिंचनाद्वारे द्यावे लागेल. बऱ्याचदा हंगामानंतरही काही बोंडे हिरवी असल्यामुळे पीक राखले जाते. अशावेळी झाडावरील बोंडांची संख्या, त्यापासून मिळणारे उत्पादन, कापूस वेचण्यासाठी मजुरांची उपलब्धता व कापसाचा बाजारभाव इ. बाबींचा विचार करून पीक सांभाळावे. अशावेळी ठिबकद्वारे उर्वरित हंगामासाठीही बोंडे भरण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात पाणी कमी असल्यास बागायती बीटी कापसाची लागवड मे महिन्यात न करता २० जूनपर्यंत केली तरी फायद्याचे ठरते.

खत व्यवस्थापन :
बीटी कापसाला साधारणपणे १००:५०:५० किलो प्रति हेक्‍टरी नत्र, स्फुरद व पालाशचा वापर करावा. पिकाच्या हंगामाचा कालावधी लांबणार असल्यास (१८० दिवसांपेक्षा जास्त) यामध्ये ३० ते ५० टक्के वाढ करावी. याशिवाय हंगामापूर्वी मातीची तपासणी करून मातीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणात वरील मात्रेमध्ये गरजेनुसार बदल करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्यास आवश्‍यकतेनुसार त्यांचा वापर करावा. साधारणत: ६० ते ७० दिवसांनंतर मॅग्नेशिअम सल्फेट २५ ते ४० किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात वापर करावा. लागवडीपूर्वी उपलब्धतेनुसार शेवटच्या पाळीपूर्वी कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. प्रवाही सिंचन पद्धतीने पाणी द्यायचे असल्यास तक्ता क्र. १ प्रमाणे खतांचे वेळापत्रक ठरवावे.

ठिबकद्वारे खते देण्याचे तंत्र ः
ठिबक संचाद्वारे खते देणेच जास्त योग्य असते. या प्रक्रियेस फर्टिगेशन म्हणतात. खते देण्यासाठी व्हेंचुरीचा वापर जास्त सोयीचा आहे. खतमिश्रित पाण्यात व्हेंचुरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाइपला जोडले जाते व मुख्य पाइपवरील व्हॉल्व्हच्या साहाय्याने खतामधील पाणी मुख्य प्रवाहात सोडता येते. पाण्यात विरघळणारी सर्व खते या प्रक्रियेने पिकांना देता येतात. यासाठी संचासोबत व्हेंचुरी व बायपास असेंब्ली व्हॉल्व्हसह घेण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये खर्च येतो.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खतांची वापर कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे आहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतांपैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक संचातून द्यावा. ठिबकद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्‍य नसल्यास, आठवड्यातून / पंधरवड्यातून एकदा द्यावे. यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होऊन दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. तक्ता क्र. २ मध्ये विद्राव्य खतांचे कापसासाठीचे वेळापत्रक दिलेले आहे. पिकाची कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त असल्यास १३५ दिवसांपर्यंत खते देण्यासाठी खतांच्या मात्रेत २० ते ३० टक्के वाढ करावी.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

पीक विमा

पीक विमा एक जबाबदार तत्व :
पीक विमामध्ये अंतर्भूत मूलभूत तत्व हे आहे की, क्षेत्रा मध्ये पुष्कळ लोकांद्वारे काही लोकांद्वारे झालेले नुकसान वाटून घेण्यात येते. तसेच साधन संपत्ति द्वारे अहितकारक भरपाई मध्ये झालेले नुकसान चांगल्या वर्षामध्ये संचित करण्यात येते.
सर्वसाधारणपणे पीक विम्याचे तत्व खालील रूपात स्पष्ट करण्यात येऊ शकेल :-
१          व्यक्तिगत शेतक-यांद्वारे  सामना केलेली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात त्यांच्या सहयोगा मार्फत विमाकाराला हस्तांतरित करता येईल, ज्याच्या लाभाकरिता, विमेदार शेतकरी एक जोखीम विम्याचा हप्ता भरणा करतील.
२         एका विशाल क्षेत्रावर अर्थात एका विशाल क्षेत्रावर जोखमींचा समस्तर प्रसार व पुष्कळ वर्षांचा जोखमींचा उभा प्रसार, शेतक-यांच्या सहयोगाने एकूण नुकसान वाटून घेण्यात येते.
३         विमेदारा द्वारे गृहीत जोखीम विम्याचा हप्ता समूह जोखीम प्रतिबिंबित करतो. जेव्हा त्याच्या नियंत्रणा बाहेर कारणे गेल्यामुळे नुकासन होते, तेव्हा शेतक-याला क्षतिपूर्तिचा भरणा करण्याची जबाबदारी आहे, या अटीवर की, त्याने कसूर न करता विम्याच्या हप्त्याच्या भरण्याद्वारे वैध विमा कंत्राट चालू ठेवले आहे. भारतात पीक विम्याचा इतिहास :
भारतात पीक विमा योजनाः
भारतात शेतीला उत्तेजन देण्याच्या हेतूने, काही प्रायोगिक पीक विमा योजना देशामध्ये सुरु करण्यात आल्या आहेतः
दर्शी पीक विमा योजना:
ही योजना वर्ष 1979 पासून जीआयसी द्वारे सुरु करणअयात आली होती. ही योजना “क्षेत्राकडे जाणे” वर आधारित होती. ही योजना ऐच्छिक आधारावर व फक्त ऋणको शेतक-यांकरिता परिरूद्ध होती. ही योजना पीके उदा. तृणधान्ये, कनिष्ठ तृणधान्ये, गळित धान्ये, कापूस, बटाटा व हरभरा इत्यादी समाविष्ट करते. जोखीम 2:1 च्या गुणोत्तरामध्ये भारतीय साधारण विमा निगम व राज्य सरकारां दरम्याने वाटून घेण्यात येत होती. अधिकतम रक्कम, जी योजने अंतर्गत विमाकृत करण्यात येणार होती, ती पीक कर्जाच्या 100% होती, जी नंतर 150% पर्यंत वाढविण्यात आली होती. ह्या योजने अंतर्गत, अर्थसहाय्याचा 50% हिस्सा विमा प्रभारांकरिता तरतूद केलेला होता, जो 50:50 आधारावर भारत सरकार व राज्य सरकार द्वारे लहान/किरकोळ शेतक-यांना देय होता.
व्यापक पीक विमा योजना:
भारत सरकारने 1 एप्रिल 1985 पासून प्रभावी व्यापक पीक विमा योजना सुरु केली होती. ही योजना राज्य सरकारांच्या प्रत्यक्ष सहयोगा सोबत सुरु करण्यात आली होती. योजना राज्य सरकारांकरिता वैकल्पिक होती.
१. ही योजना लघु अवधि पीक उधाराशी संबद्ध होती, जी शेतक-यां करिता विस्तारित करण्यात आली होती व एक जिनसी क्षेत्र दृष्टिकोणाचा उपयोग करुन कार्यान्वित करण्यात आली होती. राज्यांची संख्या, ज्यांचा समावेश ह्या योजने अंतर्गत करण्यात आला होता, ती 15 राज्ये होती.

२. ही योजना खरीप 1999 पर्यंत कार्यान्वित होती. अनिवार्य आधारावर खाद्य पीके व गळित धान्ये पिकविण्या करिता वित्तीय संस्थांकडून पीक कर्जांचा उपयोग करून शेतक-यांना एक आसरा देणे इत्यादी ह्या योजनेची काही महत्वपूर्ण वैशिष्टये आहेत. ह्या योजने अंतर्गत व्याप्तिक्षेत्र प्रत्येक शेतकरी अधिकतम रु. 10,000/- च्या रक्कमे अधीन पीक कर्जाच्या 100% हिस्स्या करिता निर्बंधित होते. विमा हप्त्याचे दर तृणधान्ये व कनिष्ठ तृणधान्यां करिता 2% व डाळी व गळित धान्यांकरिता 5% होते. विमा हप्ता व जोखीम दावे केंद्र व राज्य सरकार द्वारे 2:1 च्या गुणोत्तरामध्ये वाटून घेण्यात येत होते. योजना राज्य सरकाराकरिता वैकल्पिक होती.
भारतात पीक विमा कंपन्या:
भारतीय कृषि विमा कंपनी मर्या. (एआयसीआय) द्वारा प्रवर्तित:
१          साधारण विमा कंपनी (जीआयसी)
२         कृषि व ग्रामीण विकासाकरिता राष्ट्रीय बॅंक (नाबार्ड)
इतर चार विमा उपकंपन्या आहेत:
१     नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि..
२         न्यू इंडिया अशुअरन्स कंपनी लि.
३         ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी लि.
४        युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.
बीएएसआयएक्सच्या सहकार्याने आयसीआयसीआय लोम्बार्डने पहिल्यांदा हवामान विम्याची तरतूद केली आहे. इफ्को टोकीयोने अलिकडेच हवामान विमा व्यवसायामध्ये प्रवेश केला आहे.


राष्ट्रीय कृषि विमा योजना (पीक विमा)

राष्ट्रीय कृषि विमा योजना (एनएआयएस) देशामध्ये रबी 1999-2000 पासून भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली होती. आमच्या राज्यामध्ये ही योजना कृषि विभाग, कृषि विमा कंपनी (कार्यान्वयन एजंसी) आणि आर्थिक व सांख्यिकी संचालनालयाच्या गोवणूकी सोबत खरीप 2000 हंगामापासून सुरु करण्यात आली आहे. राज्यामध्ये ही योजना जिल्हा सहकारी केंद्रीय बॅंका, ग्रामीण बॅंका, वाणिज्यिक बॅंका व प्राथमिक कृषि सहकारी संस्थांच्या प्रत्यक्ष सहयोगाने व गोवणूकीने कार्यान्वित करण्यात आली आहे.
उद्दिष्टे:-
  • अवर्षण, चक्रीवादळ आणि कीटक व रोग इत्यादीचा आपात यामुळे पीक वाया गेले तर शेतक-यांकरिता एका वित्तीय आधाराच्या उपायाची तरतूद करणे.
  • पुढील हंगामाकरिता एका पीक अपयशानंतर एका शेतक-याची उधार पात्रता पूर्ववत करणे.
  • शेती मध्ये प्रगतिशील शेती करण्याचे उपयोजन, उच्च मूल्य निविष्टि व उच्चतम तंत्रशास्त्र अंगीकारण्याकरिता शेतक-यांना उत्तेजन देणे.
  • शेती उत्पन्नात स्थैर्य आणण्या करिता मदत करणे, मुख्यतः आपात वर्षांमध्ये.
पीक संरक्षण:-
खरीप 2008 दरम्याने, वीस पीके संरक्षित करण्यात येतील उदा. 1. भात, 2. जवार, 3. बाजरा, 4. मका, 5. काळा हरभरा, 6. हीरवा हरभरा, 7. लाल हरभरा, 8. सोयाबीन, 9. भुईमूग (आय), 10. भुईमूग (युआय), 11. सूर्यफूल, 12. एरंडेल, 13. ऊस (पी), 14. ऊस (आर), 15. कापूस (आय), 16. कापूस (युआय), 17. मिरची (आय), 18. मिरची (युआय), 19. केळी, 20. हळद.

रबी 2007-08 दरम्याने, अकरा पीके संरक्षित करण्यात आली होती उदा. 1. भात, 2. जवार (युआय), 3. मका, 4. हिरवा हरभरा, 5. काळा हरभरा, 6. भुईमूग, 7. सूर्यफूल, 8. मिरची, 9. कांदा, 10. आंबा, 11. बेंगाल हरभरा.

राज्य अनुसार पीकांचे संरक्षण
राज्य संरक्षित क्षेत्र (हेक्टर मध्ये) संरक्षित पीके
आंध्र प्रदेश 3648680.76 भात, जवार, बाजरा, मका, रगी, काळा हरभरा, हिरवा हरभरा, लाल हरभरा, भुईमूग (आय), भुईमूग (युआय), एरंडेल, सूर्यफूल, कापूस (आय), कापूस (युएन आय), ऊस (पी), ऊस, मिरची (आय), मिरची (युआय), केळी, सोयाबीन, लाल मिरची, कांदा
आसाम 13068.80 आहू भात, साली भात, ताग, बोरो भात, गहू, रेइप व मोहरी, बटाटा, ऊस
बिहार 839012.71 भात, मका, मिरची, गहू, चणा, मसुर, अरहर, रेइप व मोहरी, बटाटा, कांदा, ऊस, ताग
छत्तीसगड 1375145.37 भात (युआय), कोडो कुटकी, भात (आय), सोयाबीन, भुईमूग, अरहर, जवार, तीळ, मका, गहू (युआय), गहु (आयआरआर), बेंगाल हरभरा, रेइप व मोहरी, जवस, बटाटा
गोवा 606.79 भात, रगी, भुईमूग, ऊस, डाळी
गुजरात 1896094.18 बाजरा, मका, काळा हरभरा, हिरवा हरभरा, तूर, केळी, भुईमूग, रगी, एरंडेल, मॉथ (पतंग), तीळ, कापूस, गहू (आय), गहू (युआय) रेइग व मोहरी, हरभरा, बटाटा, एस भुईमूग, एस बाजरा, जिरे, इझाबगोल, लसूण, कांदा
हरियाणा 71262.78 बाजरा, मका, कापूस, अरहर, हरभरा, मोहरी
हिमाचल प्रदेश 20250.44 भात, मका, बटाटा, गहू, सातू
जम्मू व काश्मीर 7588.61 भात, मका, गहू (आय), गहू (युआय), मोहरी
झारखंड 517036.32 भात, मका, बटाटा, गहू, रेइप व मोहरी, बेंगाल हरभरा
कर्णाटक 2692781.22 भात (आय), भात (आरएफ), जवार (आय), जवार (आरएफ), बाजरा (आय), बाजरा (आरएफ), मका (आय), मका (आरएफ), रगी (आय), रगी (आरएफ), नवाने (आरएफ), सावे (आरएफ), तूर (आय), तूर (आरएफ), काळा हरभरा, हिरवा हरभरा (आरएफ), घोड्याचे चणे, भुईमूग (आय), भुईमूग (आरएफ), सूर्यफूल (आय), सूर्यफूल (आरएफ), सोयाबीन (आय), सोयाबीन (आरएफ), तीळ (आरएफ), एरंडेल (आरएफ), बटाटा (आय), बटाटा (आरएफ), कांदा (आय), कांदा  (आरएफ), कापूस (आय), कापूस (आरएफ), मिरची (आय), मिरची  (आरएफ), गहू (आय), गहू (आरएफ), बेंगाल हरभरा (आय), बेंगाल हरभरा (आरएफ), केशरफूल (सॅफ फ्लॉवर) (आरएफ), केशर फूल (आय), जवस
केरळ 24590.84 भात, टॅपिओक, अननस, हळद, आले, केळी
मध्य प्रदेश 4548265.74 भात (आय), भात (युएन), जवार, बाजरा, मका, कोडो कुटकी, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, कापूस, केळी, गहू (आय), गहू (युएन), बेंगाल हरभरा, रेइप व मोहरी, बटाटा, कांदा
महाराष्ट्र 1314168.56 भात, जवार, बाजरा, मका, रगी, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, नीगर, तूर, उडीद, मूग, कापूस, कांदा, ऊस, गहू (आय), गहू (युएन), जवार (आय), जवार (युएन), बेंगाल हरभरा, केशरफूल
मेघालय 4092.18 आहू भात, साली भात, बोरो भात, आले, बटाटा, रेइप व मोहरी
ओरीसा 1089845.97 भात, मका, भुईमूग, लाल हरभरा, नीगर, कापूस, मोहरी, बटाटा, ऊस
राजस्थान 5702717.89 भात, जवार, बाजरा, मका, मूग, मॉथ (पतंग), उडीद, भुईमूग, गाय वाटाणा (कावपिया), सोयाबीन, अरहर, तीळ, एरंडेल, गवार, गहू, सातू, हरभरा, मोहरी, तारामीरा, मसुर, धणा, जिरे, मेथी, इझाबगोल, सोन्फ
सिक्कीम 20.43 सोयाबीन, फिंगर मिलिट (बाजरी-ज्वारी इ. धान्ये), मका, अमान भात, आले, बटाटा, सातू, उडीद, मोहरी, गहू
तामीळनाडू 440005.64 भात, रगी (युआय), रगी (आय), मका (आरएफ), भुईमूग (आय), कापूस (युआय), कापूस (आयआरआर), कापूस (तांदूळ सोबती), टॅपिओक, बटाटा, कांदा, हळद, केळी, मिरची, आले, घोड्याचे चणे, काळा हरभरा, ऊस, तीळ, बाजरा (आय), जवार (आय).
उत्तरप्रदेश 2585076.36 भात, मका, उडीद, भुईमूग, सोयाबीन, ऊस, अरहर, जवार, बाजरा, तीळ, गहू, हरभरा, वाटाणा, मोहरी, बटाटा, मसुर
पश्चिम बंगाल 486718.53 अमान भात, ऑस बोरो भात, मका, गहू, रेइप व मोहरी, बटाटा
त्रिपुरा 1735.47 अमान भात, ऑस भात, बोरो भात, बटाटा
उत्तरांचल 23220.99 भात, रगी, गहू, बटाटा
अं. व नि. बेटे 106.00 भात
पॉण्डेचेरी 3719.53 भात I, II, III, कापूस, ऊस, भुईमूग
संरक्षित शेतकरी:-
पीक विमा सर्व ऋणको शेतक-यांना अनिवार्य व बिगर-ऋणको शेतक-यांना ऐच्छिक आहे.
संरक्षित जोखीम व अपवर्जन:
व्यापक जोखीम विमा बिगर टाळता येण्याजोग्या जोखीमा, उदा..:
१          नैसर्गिक आग व विजा
२         वादळ, गारपीट, चक्रीवादळ, तुफान, तुफान, तुफान, झंझावात इत्यादी.
३         पूर, जलमयता व माती घसरणे
४        अवर्षण, सुका पडणे
५        कीटक/ रोग
इत्यादी मुळे होणारे उत्पन्न नुकसान संरक्षित करण्या करिता तरतूद करेल.
टिप्पणी: युद्ध व आण्विक जोखीम, विव्देषपूर्ण नुकसान व इतर टाळता येण्याजोग्या जोखीमांमुळे होणारे नुकसान वगळण्यात येईल.

विमा हप्ता अर्थसहाय्य:
विमा हप्त्यामध्ये 50% अर्थसहाय्य भारत सरकार व राज्य/केंद्र शासित प्रदेश सरकार द्वारे समान प्रमाणात वाटून घेण्यात येणा-या लहान व किरकोळ शेतक-यांच्या संबंधा मध्ये देणे आहे. विमा हप्ता अर्थसहाय्य योजनेच्या कार्यान्वयनाच्या पहिल्या वर्षाच्या समाप्तिवर शेतक-यांचा प्रतिसाद व वित्तीय परिणामांच्या पुनर्विलोकनाच्या अधीन तीन ते पाच वर्षांच्या एका कालावधीमध्ये सूर्यास्त आधारावर एकावेळी देण्यात येईल.

क्षेत्र दृष्टिकोन व विम्याचे एकक :-
योजना “क्षेत्र दृष्टिकोन” आधारावर अर्थात विस्तीर्ण आपत्तिकरिता प्रत्येक अधिसूचित पीकासाठी निश्चित केलेली क्षेत्रे व स्थानिक आपत्ति उदा. गारपीट, माती घसरणे, चक्रीवादळ व पूर इत्यादी करिता व्यक्तिगत आधारावर चालविण्यात येईल. निश्चित केलेले क्षेत्र (अर्थात विम्याचे एकक क्षेत्र) एक ग्राम पंचायत, मंडळे, राज्य सरकार द्वारे निश्चित करण्यात येणा-या मंडळांचा किंवा जिल्हयांचा समूह असेल. तथापि, प्रत्येक भाग घेणा-या राज्य सरकारने तीन वर्षांच्या एका अधिकतम कालावधी मध्ये एकक रुपात ग्राम पंचायतीच्या स्तरापर्यंत पोहोचणे आवश्यक राहील.


विम्याची रक्कम/संरक्षणाची मर्यादा :
विम्याची रक्कम (एसआय) विमा उतरलेल्या शेतक-यांच्या विकल्पावर विमा उतरलेल्या पीकाच्या सुरुवातीच्या उत्पन्नाच्या किंमती पर्यंत वाढविण्यात येईल. तथापि, एक शेतकरी वाणिज्यिक दरांवर विमा हप्त्याच्या भरण्यावर निश्चित केलेल्या क्षेत्राच्या सरासरी उत्पन्नाच्या 150% पर्यंत सुरुवातीच्या उत्पन्न स्तराच्या किंमतीच्या पुढे त्याच्या पीकाचा विमा उतरवू शकेल. ऋणको शेतक-यांच्या प्रकरणा मध्ये विम्याची रक्कम अग्रिम पीक कर्जाच्या रक्कमेच्या कमीत कमी समान असावी. अधिक, ऋणको शेतक-यांच्या प्रकरणा मध्ये, विमा प्रभार कर्ज प्राप्त करण्याच्या प्रयोजना करिता वित्त परिमाणाच्या अतिरिक्त असतील. पीक विमा संवितरण प्रक्रियांच्या प्रकरणां मध्ये आरबीआय / नाबार्डचे मार्गदर्शन बंधनकारक राहील.

विमा हप्त्याचे दर:
विमा हप्त्याचे दर बाजरा व गळित धान्यांकरिता 3.5%, इतर खरीप पिकां करिता 2.5%, गहू करिता 1.5% व इतर रबी पिकांकरिता 2% आहेत. जर विमागणितीय आधार सामग्रीच्या आधारावर तयार केलेले दर विहित दरापेक्षा कमी आहेत तर, निम्न दर लागू होईल. लहान व किरकोळ शेतक-याची व्याख्या खालील अनुसार राहीलः-
किरकोळ शेतकरी: 1 हेक्टर किंवा कमी (2.5 एकर) जमीन धारण करणारा एक शेतकरी.

ऋतुमानता अनुशासन:
१)              ऋणको शेतक-यांकरिता पालन करण्यात येणारे विस्तृत ऋतुमानता अनुशासन खालील अनुसार राहीलः

कार्यक्रम खरीप रबी
कर्ज कालावधी एप्रिल ते सप्टेंबर ऑक्टोबर ते मार्च
घोषणा स्वीकृति करिता कट-ऑफ तारीख नोव्हेंबर मे
उत्पन्न आधार सामग्री स्वीकृतिकरिता कट-ऑफ तारीख जानेवारी / मार्च जुलै / सप्टेंबर

२)   बिगर-ऋणको शेतक-यांच्या संबंधा मध्ये प्रस्ताव स्वीकृति करिता विस्तृत कट-ऑफ तारखा खालील अनुसार राहतील :-
१          खरीप हंगामः 31 जुलै
२         रबी हंगामः 31 डिसेंबर
तथापि, ऋतुमानता अनुशासनात फेरबदल करण्यात येईल, जर आणि जेथे राज्य / केंद्रशासित प्रदेश व भारत सरकार सोबत विचारविनिमयामध्ये आवश्यक आहे.


संरक्षणाचे स्वरूप व क्षतिपूर्ति :-
राष्ट्रीय कृषि विमा योजना अंतर्गत भरपाई खालील सूत्रावर पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर आकारलेल्या सरासरी उत्पन्नाच्या आधारावर निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये निश्चित केलेल्या पिकांकरिता परिगणित करण्यात येईल.

आरंभ उत्पन्न – वास्तविक उत्पन्न
- – - – - – - – - – - – - – - – - – - – - – - -    X  विम्याची रक्कम
आरंभ उत्पन्न (कर्ज मंजूर रक्कम)

जेथे:
आरंभ उत्पन्न = हमी प्राप्त उत्पन्न
वास्तविक उत्पन्न = निश्चित केलेल्या पीकाचे वर्तमान उत्पन्न
विम्याची रक्कम = मंजूर कर्ज

जेव्हा जेव्हा उत्पन्न नुकसान आढळेल, भरपाई रक्कम भारतीय कृषि विमा कंपनी मर्यादित द्वारे परिगणित करण्यात येईल, व ती संबंधित बॅंकां द्वारे पात्र ऋणकोंच्या खात्यांमध्ये जमा करण्यात येईल. एका विशिष्ट विमा एककामध्ये, जर वास्तविक उत्पन्न आरंभ उत्पन्नापेक्षा (हमी प्राप्त) अधिक आहे, तर भरपाई शून्य राहील.

पीक विम्याकरिता अर्ज कसा करावा
प्रत्येक पीक हंगामाच्या सुरुवातीला, जीआयसी सोबत सल्लामसलत करुन राज्य सरकार /केंद्र शासित प्रदेश प्रशासन पीके अधिसूचित करेल व क्षेत्रे निश्चित करेल, जी हंगामा दरम्याने योजने अंतर्गत संरक्षित करण्यात येतील. विमा हप्त्या सोबत पीक विम्याचा मासिक पीक-अनुसार व क्षेत्र-अनुसार तपशील नोडल पॉइण्टला पाठवावा व विविध कर्ज संवितरण पॉइण्ट कडून अशा माहितीच्या प्राप्तिवर नोडल पॉइण्ट निश्चित कट-ऑफ तारखांनुसार मासिक आधारावर त्याची छाननी करेल व तो जीआयसीला पारेषित करेल. ऋणको शेतक-याने कर्जा सोबत, ज्याकरिता बॅंक त्याला खाली निर्दिष्ट रुपात घोषणा प्रपत्र भरायला व संबंधित दस्तऐवज प्रस्ताव प्रपत्राला संलग्न करायला भाग पाडेल, पीक विमा घ्यावा. बिगर-ऋणको शेतकरी, जो योजने मध्ये दाखल होण्याकरिता इच्छुक आहे, त्याने प्रस्ताव व एनएआयएसचे घोषणा प्रपत्र भरावे व ते वाणिज्यिक बॅंकेची ग्राम शाखा किंवा क्षेत्रीय ग्रामीण बॅंक किंवा सहकारी बॅंकेची पीएसीएस मध्ये विम्याच्या हप्त्या सोबत सादर करावे. प्रस्ताव स्वीकारताना विमा रक्कमेच्या तपशील, अधिकतम मर्यादा इत्यादीची पडताळणी करणे शाखा/पीएसीएसची जबाबदारी आहे. तपशील त्यानंतर एकत्रीकृत आहे व तो सरकारच्या अधिसूचने मध्ये विनिर्दिष्ट तारखांच्या पूर्वी जीआयसी राज्य स्तरीय पीक विमा विभागाला पुढील प्रेषणाकरिता संबंधित नोडल पॉइण्टना पाठवावा.

संलग्न करण्या करिता प्रपत्रेः
  1. बिगर-ऋणको शेतक-या करिता प्रस्ताव प्रपत्र
  2. ऋणको शेतक-याकरिता घोषणा प्रपत्र
  3. बिगर-ऋणको शेतक-या करिता घोषणा प्रपत्र

कृषि विमा रक्कम / विमा हप्त्याची परिगणना :
विमा हप्त्याची रक्कम काही घटकांवर उदा. शेतक-याच्या जमीनीचा आकार, त्याची वित्तीय स्थिति, विमा उतरविण्यात आलेल्या पीकांची संख्या व विम्याच्या रक्कमेवर अवलंबून आहे. शेतकरी एक दावा प्रपत्र सादर करुन बॅंकांकडून दावा करु शकतील. दावा प्रतिनिधी पीकांना हानी पोचविणा-या कारणांच्या व्याप्तिचे विश्लेषण करतील. सर्वेक्षकाच्या अहवालावर आधारित, दावा एक महिन्याच्या आत शेतक-यांना देण्यात येईल.

कृषि विमा दाव्या करिता आवश्यक दस्तऐवज :

१          शेतक-याने पदनिर्देशित शाखा / पीएसीएस जवळ जाणे आवश्यक आहे व विहित स्वरुपामध्ये प्रस्ताव प्रपत्र सादर करावे.
२         शेतक-याने लागवडयोग्य जमीनीच्या कब्जाच्या संबंधामध्ये दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे (पास बुक व उता-याची प्रत).
३         जमीन महसूल पावती संलग्न करावी.
शेतक-याने, जर आवश्यक असेल तर, क्षेत्र पेरणी पुष्टीकरण प्रमाणपत्र पुरवणे आवश्यक आहे.
दावा मान्यता व समझोता करिता प्रक्रिया:
१. विहित कट-ऑफ तारखांनुसार राज्य/केंद्र शासित प्रदेश सरकारांकडून एकदा उत्पन्न आधार सामग्री प्राप्त झाली, तर दावे आयए द्वारे तयार करण्यात व समझोता करण्यात येतील.
२. दावा  तपशीलांसोबत दावा धनादेश व्यक्तिगत नोडल बॅंकांना प्रदान करण्यात येतील. बॅंक सामान्य लोकांच्या स्तरावर, आळीपाळीने, व्यक्तिगत शेतक-यांच्या खात्यांमध्ये जमा करेल व त्याच्या सूचना फलकावर लाभाधिका-यांचा तपशील प्रदर्शित करील.
३. स्थानिक घटनेच्या उदा. गारपीट, माती घसरणे, चक्रीवादळ व पूर इत्यादीच्या संदर्भामध्ये आयए, डीएसी/राज्य/केंद्रशासित प्रदेशांसोबत विचार विनिमय करुन व्यक्तिगत शेतकरी स्तरावर अशा हानिचा अंदाज करण्या करिता एक प्रक्रिया विकसित करेल. अशा दाव्यांचा समझोता आयए व विमेदार दरम्याने व्यक्तिगत आधारावर करण्यात येईल.

हवामान विमा योजनाः
हवामानाच्या लहरींमुळे होणा-या हानिकरिता विमा-अधिक पाऊस, पावसात तूट, सूर्यप्रकाशाची उणीव इ.
आरंभ करण्यात आलेल्या हवामान विमा योजना : वर्षा बीमा२००५
व्याप्ति :
वर्षा बीमा तुटीच्या पावसामुळे पीक उत्पन्ना मध्ये अपेक्षित तुटीला संरक्षण देते. वर्षा बीमा शेतक-यांच्या सर्व प्रकारां करिता ऐच्छिक आहे. ज्यांना पावसाच्या अनिष्ट आपातामुळे वित्तीय रूपात नुकसान पोहचले आहे, ते योजने अंतर्गत विमा घेऊ शकतील. सुरुवातीपासून वर्षा बीमा शेतक-यांकरिता अर्थपूर्ण आहे, ज्यांच्या करिता राष्ट्रीय कृषि विमा योजना (एनएआयएस) ऐच्छिक आहे.


विम्याचा कालावधी :
विमा लघु कालावधी पिकां करिता जून ते सप्टेंबर, मध्यम कालावधी पिकां करिता जून ते ऑक्टोबर व दीर्घ कालावधी पिकांकरिता जून ते नोव्हेंबर दरम्याने उपयोगात येतो. अधिक, हे कालावधी राज्य-विनिर्दिष्ट आहेत. पेरणी अपयश विकल्पाच्या प्रकरणामध्ये तो 15 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत आहे.

वर्षा बीमा कसा खरेदी कराल :
प्रस्ताव प्रपत्रे सर्व कर्ज संवितरण केंद्रावर उदा. सर्व सहकारी / वाणिज्यिक / ग्रामीण बॅंकांच्या पीएसी शाखांवर उपलब्ध आहेत. सामान्य लोकांच्या स्तरावर वर्षा बीमा अंतर्गत संरक्षण एनएआयएस, विशेषतः सहकारी क्षेत्र संस्था, रूपात ग्रामीण वित्त संस्थांच्या (आरएफआय) वर्तमान जाळ्या मार्फत बहुधा देण्यात येईल. तसेच एआयसी त्याच्या जाळ्याच्या उपलब्धतेच्या अधीन प्रत्यक्ष बाजार / विम्याची तरतूद करेल. ग्रामीण क्षेत्रांमध्ये कार्य करणा-या संस्था औपचारिक व अनौपचारिक संस्था उदा. एनजीओ, स्वयं मदत समूह (एसएचजी), शेतक-यांच्या समूहांचे जाळे वर्षा बीमाच्या बटवड्याकरिता उपयोगात आणता येऊ शकेल. वर्षा बीमा अंतर्गत विम्या करिता प्रस्तावित शेतक-यां जवळ आरएफआय शाखेमध्ये एक बॅंक खाते असणे आवश्यक आहे, जी त्याचे/तिचे विमा व्यवहार सुकर करेल.

विमा खरेदी कालावधी :
एक शेतकरी इतर विकल्पांकरिता 30 जून व पेरणी अपयश विकल्पा करिता फक्त 15 जून पर्यंत वर्षा बीमा खरेदी करु शकेल.

संरक्षण विकल्पः
विकल्प - I: मोसमी पर्जन्यमान विमा :
संपूर्ण हंगामा करिता साधारण पर्जन्यमानाकडून (मिमी. मध्ये) वास्तविक पर्जन्यमाना मध्ये 20% व अधिकच्या नकारात्मक विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. वास्तविक पर्जन्यमान जून ते नोव्हेंबर पर्यंत मासिक संचयी पर्जन्यमान आहे (लघु व मध्यम कालावधी पिकांकरिता जून ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर सोबत). पैसे पूर्णपणे देण्याची संरचना ह्या प्रकारे बनविण्यात आली आहे की, उत्पन्न पर्जन्यमानामध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध श्रेणीशी परस्पर संबंद्ध आहे. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम अधिकतम संभाव्य हानिच्या तदनुरुप अधिकतम पैसे पूर्णपणे देणे आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणांवर (टप्प्यां मध्ये) राहील, जे वास्तविक पर्जन्यमानामध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध प्रमाणांनुसार असेल.
विकल्प – II: पर्जन्यमान वितरण निर्देशांक :
संपूर्ण हंगामा करिता साधारण पर्जन्यमान निर्देशांका कडून वास्तविक पर्जन्यमान निर्देशांकामध्ये 20% व अधिकच्या प्रतिकूल विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. निर्देशांक हंगामा मध्ये साप्ताहिक पर्जन्यमाना करिता परस्पर संबंध वाढविण्याकरिता निर्माण करण्यात आलेला आहे. निदेशांक आयएमडी स्टेशन ते स्टेशन व पीक ते पीक पर्यंत कमी अधिक होतील. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम अधिकतम संभाव्य हानिच्या तदनुरुप अधिकतम पैसे पूर्णपणे देणे आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणावर (टप्प्यांमध्ये) राहील, जे वास्तविक पर्जन्यमान निर्देशांका मध्ये प्रतिकूल विचलनाच्या विविध प्रमाणांनुसार असेल.

विकल्पIII: पेरणी अपयश :
15 जून व 15 ऑगस्ट दरम्याने 40%  पुढे साधारण पर्जन्यमान (मिमी. मध्ये) कडून वास्तविक पर्जन्यमाना मध्ये (मिमी. मध्ये) प्रतिकूल विचलना समोर संरक्षण दिलेले आहे. प्रत्येक हेक्टर विम्याची रक्कम पेरणी कालावधीच्या समाप्ती पर्यंत शेतक-या द्वारे केलेला अधिकतम निविष्ट खर्च आहे व ती पूर्व विनिर्दिष्ट आहे. दावा पैसे पूर्णपणे देणे एका श्रेणीबद्ध प्रमाणावर राहील, जे पर्जन्यमान विचलनांच्या विविध प्रमाणानुसार असेल. विम्याच्या रक्कमेच्या 100% अधिकतम पैसे पूर्णपणे देणे 80% व अधिकच्या विचलनांवर उपलब्ध आहे.
विम्याची रक्कम :
विम्याची रक्कम पूर्व-विनिर्दिष्ट आहे व साधारणपणे उत्पादन खर्च व उत्पादनाची किंमत दरम्याने आहे. पेरणी अपयश विकल्पाच्या प्रकरणा मध्ये, पेरणी कालावधी, जो पुन्हा पूर्व-विनिर्दिष्ट आहे, समाप्ती पर्यंत तो शेतक-या द्वारे केलेला अधिकतम निर्विष्ट खर्च आहे.

विमा हप्ता :
विमा हप्ता विकल्प ते विकल्प व पीक ते पीक पर्यंत कमी अधिक होईल विमा हप्त्याचे दर लाभ लक्षात घेऊन आशावादी आहेत, व 1% पासून सुरु होतात.
दावा भरण्याचे वेळापत्रक व प्रक्रिया:
दावे तयार करण्याची प्रक्रिया स्वयंचलित आहे अर्थात विमेदार शेतक-या द्वारे दाव्यांची सूचना किंवा गहाळ माहिती सादर करण्या करिता आवश्यकता नसेल. साधारणपणे दावे क्षतिपूर्ति कालावधीच्या समाप्ती पासून एका महिन्या मध्ये वास्तविक पर्जन्यमान आधार सामग्रीच्या आधारावर चुकता करण्यात येणार आहेत.

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

Text

Followers

Blogroll